Parking Rate Hike: मुंबईतील 'पे अँड पार्क' महागणार, १० टक्के दरवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव

Mumbai Pay And Parking: महापालिकेकडून मुंबईतील 'पे अँड पार्क' शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांना आर्थिक फटका बसणार आहे.
Mumbai Pay And Parking Price Hike

Mumbai Pay And Parking Price Hike

ESakal

Updated on

मुंबई : शहरातील अपुऱ्या पार्किंग सुविधा आणि वाहतूक कोंडीच्या समस्येशी झुंजणाऱ्या वाहनचालकांना आता महापालिकेकडून आर्थिक फटका बसणार आहे. महापालिकेने शहरातील सार्वजनिक व रस्त्यांवरील पार्किंग शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून शुल्कात कोणतीही वाढ न झाल्याने हा निर्णय घेण्यात येत असून, लवकरच पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com