
उल्हासनगर : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शरसींग रुक्कनतसिंग डागोर यांनी महापालिका सफाई कामगारांच्या समस्या समजून घेऊन आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या सोबत आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी बहुतांश मागण्या मान्य करून ५६ रिक्त सफाई कामगारांचे पदे तीन महिन्यात भरण्याचे आश्वासन दिल्याचे डागोर यांनी सांगितले.