esakal | 5 हजार खाटांच्या महारुग्णालयाची तयारी सुरू; पालिकेने जमिनीसाठी मागितले अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

5 हजार खाटांच्या महारुग्णालयाची तयारी सुरू; पालिकेने जमिनीसाठी मागितले अर्ज

या महारुग्णालयासाठी 20 एकर भूखंडाची आवश्यकता आहे. त्यासाठी जमीन मालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. खासकरून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील जमीन अपेक्षित आहे.

5 हजार खाटांच्या महारुग्णालयाची तयारी सुरू; पालिकेने जमिनीसाठी मागितले अर्ज

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 27 जुलै रोजी राज्य सरकारच्या कोव्हिड टास्क फोर्सची बैठक झाली होती. त्यात कोव्हिड सारख्या वैश्विक महामारीसाठी कायमस्वरुपी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महामुंबईसाठी सुमारे 5 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. 

औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

मुंबईसह महामुंबईसाठी उभारण्यात येणाऱ्या 5 हजार खाटांच्या रुग्णालयाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. खासगी जमीन मालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या मानखुर्द येथील जकात नाक्याचे क्षेत्रफळ सुमारे 100 एकर आहे. मात्र, महापालिकेने पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील किमान 20 एकरसाठी जागा मालकांकडून अर्ज मागवले आहेत.

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...​

या महारुग्णालयासाठी 20 एकर भूखंडाची आवश्यकता आहे. त्यासाठी जमीन मालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. खासकरून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील जमीन अपेक्षित आहे. मुंबईची जकात व्यवस्था बंद झाली असून सर्व जकात नाके मिळून 48 हेक्टर म्हणजे 118 एकरच्या आसपास भूखंड उपलब्ध आहेत. तर मुलूंड पूर्व पश्चिम आणि एरोली येथील तीन जकात नाक्यांचे क्षेत्रफळ हे 13 एकर पेक्षा अधिक आहे.

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

जमीन देण्यासाठी अर्ज मागविताना एकत्रित 20 एकर जमीन खरेदी करण्यात येणार नसून गरजेनुसार जमिनीचे हस्तांतर करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.10 ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज सादर करायचे आहेत. 5 हजार खाटांसाठी बांधण्यात येणाऱ्या रुग्णलयात महामुंबईतील रुग्णासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच, इतर वेळी नियमीत आजारांसाठी हे रुग्णालय वापरण्यात येईल. मात्र, कोविड सारख्या आजारांच्या काळात वापरण्यासाठी या रुग्णालयाचे नियोजन करण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...


जकात नाक्‍यांच्या भूखंडाचे क्षेत्रफळ - 48 हेक्‍टर
- मानखुर्द - 41.52 हेक्‍टर
- मुलूंड पुर्व पश्‍चिम आणि ऐरोली - 5.44 हेक्‍टर
- दहिसर - 2.2 हेक्‍टर 
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top