esakal | मुंबई महापालिकेने बदलले नियम, आता कोरोना चाचणीशिवाय घरी जाता येणार नाही..
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महापालिकेने बदलले नियम, आता कोरोना चाचणीशिवाय घरी जाता येणार नाही..

सामान्य नागरीकांना कोविड चाचणी करायची असल्यास प्रिस्क्रिशनची गरज भासणार नाही.

मुंबई महापालिकेने बदलले नियम, आता कोरोना चाचणीशिवाय घरी जाता येणार नाही..

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई : महापालिकेतर्फे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये  असलेल्या हायरिस्क आणि लो रिस्क दोन्ही प्रकारच्या व्यक्तींची आता डिशचार्जवेळी कोरोना टेस्ट करणं आता बंधनकारक करण्यात आले आहे. ही चाचणी नकारात्मक आली तरच या रुग्णांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यापुर्वी 14 दिवसांनी या नागरीकांना चाचणी न करता घरी जाण्याची परवानगी दिली जात होती. सध्या 12 हजाराहून अधिक नागरीक  इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केंद्रामध्ये आहेत.

BIG NEWS - UGC च्या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक, उचलणार 'हे' मोठं पाऊल..

चाळी आणि झोपडपट्टीत एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या नजिकच्या संपर्कातील हायरिस्क व्यक्तींसह शेजारच्या काही व्यक्तींना पालिकेच्या केंद्रांत क्वारंटाईन केले जाते. सुरवातीच्या काळात या व्यक्तींची डिशचार्जपूर्वी कोविड चाचणी केली जात होती. मात्र, मे महिन्यापासून ज्या व्यक्तींमध्ये कोविडची लक्षणं नाहीत अशाना 14 दिवसांनी घरी पाठवले जात होते. मात्र, यावरुन अनेक वेळा वादही झाले. महापालिकेने आता अशा व्यक्तींनाही चाचणी बंधनकारक केली आहे. या व्यक्तींचा कोविड अहवाल नकारात्मक आला तरंच त्यांना घरी जाता येणार आहे.

BIG NEWS - TB बाधित रुग्णांवर कोरोनाचा कोणताही परिणाम नाही? जाणून घ्या असं का होतंय..

प्रिस्क्रिशनशिवाय होणार कोविड चाचणी 

सामान्य नागरीकांना कोविड चाचणी करायची असल्यास प्रिस्क्रिशनची गरज भासणार नाही. शहरातील 17 खासगी प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी कोविड सदृष्य लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाही करता येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने निर्धारीत केल्या प्रमाणे निर्धारित दरांनुसार प्रती चाचणी  2 हजार 500  रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे. तर वैद्यकीय चाचणीसाठीचे नमूने हे संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन घेतल्यास त्यासाठी  चाचणी  2 हजार 800 रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे. 

BMC to test covid patients before giving discharge new rules by ICMR

loading image