UGC च्या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक, उचलणार 'हे' मोठं पाऊल... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

राज्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असतानादेखील केंद्रीय गृह मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असतानादेखील केंद्रीय गृह मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार युजीसीकडून सर्व विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी संघटनांनी या विरोधात रान उठविण्यास सुरुवात केली आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेने परिक्षावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर विद्यार्थी भारती संघटनेने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

TB बाधित रुग्णांवर कोरोनाचा कोणताही परिणाम नाही? जाणून घ्या असं का होतंय..

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत चालल्याने युजीसीने एप्रिल महिन्यात परिक्षांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थांना परीक्षा द्यायची आहे, त्यांना परीक्षा देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युजीसीकडून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असतानादेखील केंद्र सरकारने परीक्षा घेण्यासाठी युजीसीला निर्देश दिल्याने याविरोधात राज्यातील विद्यार्थी संघटनांनी आंदोलन छेडले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी 'या' फाऊंडेशनने घेतला पुढाकार; राज्यातील रुग्णांसाठी 'इतके' इंजेक्शन्स आयात करणार...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले म्हणाले की, युजीसीचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी युजीसीच्या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत. युजीसीने घेतलेल्या निर्णयाने राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे युजीसीने जारी केलेले परिपत्रक उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर फाडून या निर्णयाचा निषेध केला.

आर्थिक राजधानी मुंबईत आजच्याच दिवशी पहिल्यांदाच वाजला होता गिरणीचा भोंगा, नाव होतं...

विद्यार्थी भारती संघटनेच्या मंजिरी धुरी म्हणाल्या की, युजीसी आणि केंद्र सरकार परीक्षाबाबत राजकारण करत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. येत्या सात दिवसात परीक्षा रद्द केली नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल. विद्यापीठांनी परीक्षा आयोजित केल्या तर आम्ही परीक्षावर बहिष्कार टाकणार असल्याची भूमिका छात्रभारती आणि प्रहार विद्यार्थी संघटनेने घेतले आहे.

students associations in mumbai aggressive over UGCs decision to grant permission to conduct exams


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students associations in mumbai aggressive over UGCs decision to grant permission to conduct exams