मुंबईत आज सुरु होणार लसीकरण

फक्त ही केंद्रे बंद राहतील
vaccination
vaccinatione sakal

मुंबई: आज तीन दिवसानंतर मुंबईत लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. तीव्र चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) लसीकरण केंद्रे तीन दिवस बंद (vaccination in mumbai) होती. महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सर्व केंद्रे सुरू होणार नाहीत. वादळाचा फटका बसलेल्या केंद्रांवर लसीकरण बंद राहील. (From today onwards again vaccination drive will start in mumbai)

14 मे ते 17 मे दरम्यान चक्रीवादळामुळे पालिकेने लसीकरण केंद्र बंद ठेवली होती. चक्रीवादळाचा प्रभाव सोमवारी कमी झाल्यानंतर  मंगळवारी लसीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू होईल.

vaccination
खवळलेल्या समुद्रात कोस्ट गार्डचं यशस्वी ऑपरेशन

काही लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्यता -

वादळासह पावसाने प्रभावित झालेली काही लसीकरण केंद्रे उद्या (मंगळवार 18 मे 2021 रोजी बंद राहणार आहेत. कोविशिल्ड लस देताना, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेनंतर किमान 12 ते 16 आठवडे (किमान 84 दिवस) पूर्ण केलेल्यांनाच दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.

vaccination
मुंबईत म्युकर मायकोसिसमुळे पहिला मृत्यू

त्यामुळे 60 वर्ष वयोगटातील नागरिक 24 मे 2021 नंतर दुसऱ्या मात्रेसाठी पात्र राहतील. याअनुषंगाने 18 मे 2021 आणि 19 मे 2021 या दोन्ही दिवशी कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेसाठी 60 वर्ष व त्यावरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर थेट (वॉक इन) जाऊन लस घेता येईल. लसीकरण मोहिमेच्या नियोजनास मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com