esakal | कोरोनापाठोपाठ लेप्टोच्या नियंत्रणासाठी पालिका सज्ज; 50 हजार उंदरांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

rats

पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया काविळ, अतिसार, हिवताप या आजारांसह लेप्टोचाही धोका अधिक असतो.

कोरोनापाठोपाठ लेप्टोच्या नियंत्रणासाठी पालिका सज्ज; 50 हजार उंदरांचा खात्मा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया काविळ, अतिसार, हिवताप या आजारांसह लेप्टोचाही धोका अधिक असतो. सध्या कोरोनाच्या विळख्यातही या विभागाने गेल्या पाच महिन्यात 50 हजार उंदीर मारले आहेत.

मोठी बातमी ः आता काय बोलणार! सायन हायवेवर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

मुंबईकरांना या साथीच्या आजाराचा धोका होऊ नये, यासाठी किटक नाशक विभाग सतर्क झाला असून लेप्टोच्या आजार पसरवणाऱ्या उंदरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी ते 28 मे पर्यंत या पाच महिन्यांत 53 हजार 89 उंदीर पालिकेच्या किटकनाशक विभागाने मारले आहेत. लेफ्टोवर नियंत्रणासाठी पालिकेची मोहिम सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोठी बातमी ः ...म्हणून मुंबई पोलिस स्टेशनमधील सॅनिटायझिंग स्प्रे मशीन हटवल्या

पावसाळ्यात पूर्व मुंबई शहर व दोन्ही उपनगरात कीटक नाशक फवारणी करण्यात येते. तसेच डेंग्यू व मलेरिया डांसाची उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यात येतो. यासह लेप्टोचा प्रादुर्भाव रोखणे यावरही लक्ष केंद्रित केले जाते. पावसाळ्यात मुंबईत पाणी भरण्याच्या 436 ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी पाणी भरण्याच्या या ठिकाणी उंदरांच्या बिळांचाही शोध घेण्यात आला. यावेळी कीटकनाशक विभागाला 29,358 उंदरांची बिळे आढळून आली आहेत. या बिळात उंदीर मारण्याच्या गोळ्या टाकत बिळे मातीने बुजवली आहेत. दुसऱ्या दिवशी पाहणी केली असता बहुतांश बिळात उंदीर मेल्याचे आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मोठी बातमी ः मुंबईत या पाच स्थानकांहून टॅक्सी सेवा सुरु, अशी करा टॅक्सी बुक


पावसाळ्यात लेप्टोचा प्रादुर्भाव रोखण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. पाणी भरण्याच्या ठिकाणचे सर्वेक्षण करून जानेवारी ते 28 मे पर्यंत 53,089 उंदरांना मारण्यात आले आहे. पुढे देखील ही मोहीम राबवली जाणार आहे.
- राजेंद्र नारिंग्रेकर, अधिकारी, किटकनाशक विभाग

 

पाच महिन्यात मारलेले उंदीर

महिना   मारलेले उंदीर
जानेवारी  6265 
फेब्रुवारी   6037
मार्च  28779
एप्रिल   6835
मे 28 पर्यंत   5174

    
                 

loading image
go to top