esakal | ...म्हणून मुंबई पोलिस स्टेशनमधील सॅनिटायझिंग स्प्रे मशीन हटवल्या
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून मुंबई पोलिस स्टेशनमधील सॅनिटायझिंग स्प्रे मशीन हटवल्या

अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पोलिस स्टेशनमध्ये बसविण्यात आलेल्या सेनेटिझाइंग स्प्रे मशीनबाबत तक्रार केली आहे. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी मशीनचा वापर बंद केला.

...म्हणून मुंबई पोलिस स्टेशनमधील सॅनिटायझिंग स्प्रे मशीन हटवल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये कंटेन्मेंट झोन मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पोलिस रस्त्यावर अहोरात्र मेहनत घेताहेत. पोलिस विभागातही अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. तर अनेक कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे मृत्यू ही झालेत. पोलिसांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी पोलिस स्टेशनमध्ये सेनेटिझाइंग स्प्रे मशीन बसवण्यात आल्या आहेत. त्यातच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पोलिस स्टेशनमध्ये बसविण्यात आलेल्या सेनेटिझाइंग स्प्रे मशीनबाबत तक्रार केली आहे. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिस कर्मचार्‍यांनी मशीनचा वापर बंद केला. मानवी शरीरावर ज्या पद्धतीनं सेनेटिझाइंग स्प्रे करण्यात येतात. त्यामुळे ती रसायनं शारीरिक आणि मानसिक दोन्ही नुकसान करू शकतात, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.

अरे वाह! कोरोनाच्या लढतीत मुंबईकरांच्या हाती आणखी एक यश

सल्लागारानं सांगितल्यानुसार, मानवी शरीरावर क्लोरीन फवारल्यामुळे डोळे आणि त्वचेचा त्रास तसंच मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. सोडियम हायपोक्लोराइट (sodium hypochlorite) श्वास घेताना, नाक, घसा, श्वसनमार्गावर श्लेष्मल त्वचेची जळजळ होऊ शकते आणि ब्रोन्कोस्पाझम (bronchospasm) (श्वास घेण्यात अडचण) देखील होऊ शकते. 
 
जेव्हा कोविड-19 (साथीचा रोग) सर्व देशभर सुरू झाला, तेव्हा प्रशासनानं आणि स्वयंसेवी (NGOs) संस्था यांच्यामार्फत पोलिस स्टेशनमध्ये स्प्रे मशीन बसविण्यात आले. पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश करताना पोलिस कर्मचाऱ्यांना प्रथम क्यूबिकलमध्ये प्रवेश करावा लागतो आणि त्यानंतर त्यांच्यावर सेनेटिझाइंग फवारणी केली जाते. 

मुंबईतल्या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचा स्तुत्य निर्णय... बाप्पाचे आगमन होणार पण...

नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलिस कर्मचाऱ्यानं एका वृत्तपत्राला सांगितलं की, 
यापूर्वी आम्ही या स्प्रे मशीनचा आनंद घेतला. असं वाटलं की आपण आंघोळ करत आहोत आणि तुम्हाला रिफ्रेश वाटेल. पण दोन-तीन दिवस सतत वापर केल्यावर आम्हाला त्याचा त्रास सुरु होण्यास सुरुवात झाली. यामुळे आमच्या डोळ्यामध्ये जळजळ झाली आणि आम्हाला उलट्याही झाल्या. त्यानंतर आम्ही त्या मशिनचा वापर थांबवला आणि आमच्या वरिष्ठांना पोलिस स्टेशनमध्ये कळविले.

दुसऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यानं म्हटलं की, सेनेटिझाइंग स्प्रे मला मळमळ व्हायची आणि श्वास घेण्यास त्रास व्हायचा. त्यानंतर डॉक्टरांनी मला सल्ला दिला की तुम्ही शरीरावर, विशेषत: डोळे आणि तोंडावर सेनेटिझाइंग स्प्रे करु नका.


आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या रक्षणासाठी ही मशीन बसवली आणि ती पोलिस स्टेशनबाहेर व्यवस्थापित केली. पण त्यानंतर सेनेटिझाइंग स्प्रे करणं धोकादायक असल्याची आम्हाला माहिती देण्यात आली आहे. आम्ही आता स्प्रे मशीन वापरत नाही आणि लवकरात लवकर ती काढून देखील टाकणार असल्याचं कस्तुरबा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंनी करुन दाखवलं, कोरोनाचा 'हा' हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेनं 

आम्ही पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना ही स्प्रे मशीन काढून टाकण्याच्या सूचना दिल्यात. आम्ही त्यांना ग्लोव्हज, मास्क, face shields आणि पीपीई किट देण्यात आलेत. पोलिस विभागाने सॅनिटायझिंग बूथची सुविधा दिली नाही. काही पोलिस स्टेशननी स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने किंवा त्यांच्या स्वत: च्या मर्जीने स्थापित केलं आहे. स्प्रे मशीन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top