

Mumbai Exotic Birds Park
ESakal
मुंबई : महानगरपालिकेतर्फे मुलुंड (पश्चिम) येथील नाहूर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘विदेशी पक्षी उद्यान’ उभारण्यात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज (रविवार, ता. १४) सायंकाळी ५.३० वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात श्रीमती मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही होणार आहे.