Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

BMC : मुंबईत पाऊस पडताच अनेक ठिकाणी पाणी तुंबले जाते. यामुळे पावसाळ्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून मुंबईतील भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविण्यात येणार आहेत.
BMC Deploy 547 water pumps in Mumbai

BMC Deploy 547 water pumps in Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत ४९६ पावसाचे पाणी भरण्याची ठिकाणे असून त्यापैकी ८० ठिकाणी पावसाळी पाणी तुंबण्याचा धोका आहे. भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसवण्यात येणार आहेत. पंप कार्यान्वित आहे की नाही याचे पंप चालकाला मोबाइलद्वारे फोटो पाठवणे बंधनकारक आहे. पंपाची अपडेट स्मार्ट फोनद्वारे पालिकेच्या नियंत्रण कक्षाला मिळणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. पावसाळापूर्व कामाची आढावा बैठक आज पालिका मुख्यालयात पार पडली. त्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com