धक्कादायक ! 7 मृतदेह 24 तास तसेच पडून... मृत्यू पश्चात मृतदेहांची हेळसांड !

धक्कादायक ! 7 मृतदेह 24 तास तसेच पडून... मृत्यू पश्चात मृतदेहांची हेळसांड !

मुंबई , ता. 27 : कोरोना संसर्गाच्या भीतीने कामगार मृतदेहांना हात लावण्यास कोणी तयार होत नसल्याने मृतदेह क्वारंटाईन सेंटरमध्येच तासोनतास पडून राहिल्याचे प्रकार वाढले आहे. पालिकेच्या केईएम रूग्णालयात देखील तब्बल 7 मृतदेह 24 तास पडून असल्याचे समोर आले आहे.

अखेर रुग्णालयाने शर्थीचे प्रयत्न करून हे मृतदेह तेथुन बाहेर काढले. काही दिवसांपूर्वीच कूपर रुग्णालयात देखील असा प्रकार घडला केईएम रुग्णालयात वॉर्ड नंबर 4 मध्ये क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये सध्या 35 ते 40 रुग्ण दाखल आहेत. त्यातील काही रुग्ण हे गंभीर देखील आहेत.अश्याच गंभीर रुग्णांपैकी 7 जणांचा मृत्यू मागील 2 दिवसात झाला.

मात्र मृत्यू नंतर ही ते मृतदेह क्वारंटाईन सेंटर मध्येच 24 तासाहून अधिक तास पडून होते. महत्वाचे म्हणजे त्या सेंटर मध्ये उपचार घेत असणारे इतर रुग्ण ही होते त्यामुळे त्यांना अश्या भयावह परिस्थितीतच काही तास काढावे लागले.

कोरोना संसर्गामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मृत्यू पश्चात अनेक रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कामगारांमध्ये ही चांगलीच दहशत पसरली आहे. त्यामुळे किणताही कामगार पीपीई किट आणि मास्क घातल्याशिवाय मृतदेहाला हात लावायला तयार होत नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या कुपर रुग्णालायत ही मृतदेह पडून होते.

अखेर दुपारी रुग्णालय प्रशासनाच्या ही बाबत लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच पावलं उचलली. क्वारंटाईन सेंटरमधील सर्व मृतदेह तातडीने हलवण्यात आले. त्यातील काही मृतदेह शवागरात,काही नातेवाईकांकडे तर काही मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती मिळाली.

केईएम हे मुंबईतील प्रमुख रुग्णालयांपैकी एक आहे. इथे दररोज सरासरी 8 ते 9 मृत्यू होतात. या मृतदेहांना हाताळण्यासाठी वेगळी फॉरेन्सिक टीम बनवण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मृतदेह उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

bodies of covid 19 patients who past away are laying more than 24 hours at KEM hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com