ट्रेन्सचं ऑनलाईन बुकिंग आजपासून होणार सुरु, कसं कराल ऑनलाईन बुकिंग? जाणून घ्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी पाठवण्यासाठी भारतीय रेल्वेनं स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी पाठवण्यासाठी भारतीय रेल्वेनं स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत 12 मेपासून नवी दिल्लीतून वेगवेगळ्या राज्यात 15 स्पेशल एसी गाड्या चालवण्यात येतील. त्यातच महत्त्वाची बातमी म्हणजे, या स्पेशल ट्रेनसाठी आज संध्याकाळपासून तिकिट बुकिंग सुरू होणार आहे. चार वाजल्यापासून या गाड्यांची तिकिटं ऑनलाईन बुक केली जाऊ शकणार आहेत. त्यातच महत्त्वाची सूचना अशी की ही तिकिटं केवळ ऑनलाईनचं बुक होतील. ही बुकिंग तुम्ही भारतीय रेल्वेची अधिकृत साईट IRCTC वर करु शकणार आहात. 

तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या 

भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट www.irctc.co.in वर लॉग इन करा. 

वेबसाईटवर तुम्हाला LOGIN चा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर त्यात यूझर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरा. एखाद्याच IRCTC वर लॉगइन आयडी नसेल तर REGISTER ऑप्शनवर क्लिक करा. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक, नाव ईमेल आयडी आणि पत्ता टाकावा लागेल. 

मोठी बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल...

ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही Book Your Ticket लिहिलेल्या बॉक्सवर क्लिक करा. त्यात आवश्यक अशी माहिती तुम्हाला टाकावी लागेल. तुम्हाला कोणत्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्याची माहिती भरा. From च्या पर्यायावर तुम्ही जेथून प्रवास करणार ते ठिकाण आणि To च्या पर्यायावर ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण भरा. यानंतर तारीख सिलेक्ट करून Find Trains वर क्लिक करा.

तुम्ही भरलेल्या दोन्ही स्थानकांदरम्यान असलेल्या सर्व स्पेशल ट्रेनची यादी तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर Check Availability & Fare चा पर्याय दिसेल. तिथेच तुम्हाला स्लिपर क्लास, एसी 3 टायर, एसी 2 टायर, एसी फर्स्ट क्लास, एसी चेअर कार आणि एग्जिक्युटिव्ह चेअर असे पर्याय दिसतील. Check Availability & Fare वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रेनचे तिकिट उपलब्ध आहे ते दिसेल. 

ज्या ट्रेनचे तिकिट तुम्हाला बुक करायचे आहे, त्यावर सिलेक्ट करा आणि Book Now वर क्लिक करा. 

अडकलेल्या नागरिकांनो! घरी जाण्यासाठी ST महामंडळाशी असा साधा संपर्क

बुक नाऊवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं नाव, वय, लिंग, मोबाइल नंबरसह इतर माहिती त्यात भरा आणि Continue Booking वर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर पेमेंटचा पर्याय असलेली विंडो ओपन होईल. यात रेल्वेनं तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग किंवा मोबाइल वॉलेटच्या मदतीनं पेमेंट करण्याचा पर्याय दिला आहे. तुमच्या सोयीनुसार ते पेमेंट तुम्ही करु शकता. 

पेमेंट झाल्यानंतर तुमचे तिकिट बुक होईल. तिकिट बुक झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल. तिकिट बुक झाल्यानंतर प्रिंटचा पर्यायही येतो.

सावधान ! डोळ्यांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग? चिंताजनक अहवाल

कोणकोणत्या शहरांमध्ये धावेल स्पेशल ट्रेन 

नवी दिल्लीहून  बिलासपूर, दिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई मध्यवर्ती, अहमदाबाद आणि जम्मूतावी या मार्गांवर हा स्पेशल ट्रेन धावणार आहेत. दरम्यान या गाड्यांमध्ये जागा राखीव करण्यासाठी प्रवाशांना सुटण्याच्या वेळेच्या किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित राहावे लागणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. 

असं असेल ट्रेनचं भाडं

या गाड्यांचे भाडे सुपर फास्ट ट्रेनसारखेच असणार आहे. या गाड्यांच्या डब्यांच्या सर्व 72 जागांवर बुकिंग करण्यात येणार असून त्यांच्या भाड्यात कोणतीही सूट मिळणार नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

IRCTC to start online bookings of trains know full procedure :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IRCTC to start online bookings of trains know full procedure