esakal | पुरुषी अहंकार, पुरुषत्वाशी जोडलेल्या लैंगिक भावना आणि इंटरनेटच्या माध्यमातून उघडकीस आलेले सनसनी चॅट्स..
sakal

बोलून बातमी शोधा

पुरुषी अहंकार, पुरुषत्वाशी जोडलेल्या लैंगिक भावना आणि इंटरनेटच्या माध्यमातून उघडकीस आलेले सनसनी चॅट्स..

आपल्या समाजात 'सेक्स किंवा लैंगिकता' या शब्दांना इतके बदनाम समजतात की कोणाची बोलण्याची हिंमत होत नाही

पुरुषी अहंकार, पुरुषत्वाशी जोडलेल्या लैंगिक भावना आणि इंटरनेटच्या माध्यमातून उघडकीस आलेले सनसनी चॅट्स..

sakal_logo
By
योगेश कानगुडे

मुंबई - सारं जग कोरोना या व्हायरसशी लढतंय. भारतातही वातावरणही काही वेगळे नाही. टीव्ही, न्यूजपेपर आणि इतर समाज माध्यमांत फक्त एकच चर्चा आहे ती फक्त कोरोना व्हायरसची. या गोष्टींमुळे लोकं सध्या भीतीच्या सावटतात जगत आहे. अशातच गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी एका घटनेने देशभर खळबळ माजून दिली. ती घटना म्हणजे ‘बॉइज लॉकर रूम. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर #Boyslockerroom या हॅशटॅगने खळबळ माजवली. दिल्लीमधील शाळकरी मुलांनी ‘बॉइज लॉकर रूम' नावाचा ग्रुप तयार केला आणि आपल्याच वर्गातील मैत्रिणींचे अश्लील फोटो एकमेकांना पाठवून त्यावर अश्लील गप्पा मारल्या. आपल्या समवयीन वर्गमैत्रिणींवर बलात्कार करण्याची चर्चा ग्रुपवर सुरु होती. या दरम्यान या ग्रुप चॅटवर नव्याने सदस्य बनलेल्या एक मुलाला हे सगळं वाचून अस्वस्थ वाटले आणि त्याने या चर्चेचे स्क्रीनशॉट आपल्या मैत्रिणींना पाठवले. या मैत्रिणींनी मग वेळ न दवडता हे सगळे प्रकरण इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले आणि एकच खळबळ माजली. अखेर पोलिसांनी सायबर कायद्यानुसार तक्रार नोंदवली व काही विद्यार्थ्यांची चौकशीही सुरू केली.

उद्यापासून 'या' शहरात सुरु होऊ शकतात पॅसेंजर ट्रेन

खरं तर सामूहिक बलात्काराची समाज माध्यमांवर करणाऱ्या या मुलांना आपण काय करतो आहोत, हे माहित नसण्याचे कारण फक्त ‘लहान वय’ हे म्हणता येणार नाही. समाजात आजही बलात्कार ही पुरुषत्वाच्या संकल्पनेशी जोडलेली गोष्ट आहे आणि त्यात समोरच्या व्यक्तीच्या मान्यतेशिवाय अत्याचार करणे याला मान्यता दिली जाते आहे. असे वातावरण हे जगात निर्माण झाले आहे. या वातावरणात ही आपल्या तारुण्यात प्रवेश करत आहेत. तारुण्यात प्रवेश करत असताना त्यांच्या मनात काय भावना आहेत हे फक्त उघड झाले आहे. या घटनेमुळे आपण सामाजिक स्तरावर किती प्रगती केली आहे स्पष्टपणे अधोरेखित करणारी ही घटना आहे. ही फक्त एकच घटना आहे. बाकीच्या शहरात, आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या घरात अशा घटना घडत असतात. त्या उजेडात येईपर्यंत कोणालाही त्याचे गांभीर्य वाटत नाही. असं काही समोर आलं की आपण हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि तो समूळ नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत याची फक्त चर्चा करतो. पण प्रत्यक्षात मात्र कृती दिसत नाही. त्यामुळे तो प्रश्न तिथेच राहतो आणि असं काही घडलं की पुन्हा डोकं वरती काढतो. 

या घटनेत पुढील तपास केल्यानंतर आणखीनच धक्का देणारी माहिती समोर येतंय. या ग्रुपमध्ये बनावट आयडी किंवा अकाउंट तयार करून एका मुलगी बलात्काराची चर्चा करत होती. याची पोलिसांनी या मुलीकडे चौकशी सुरु केली आहे. सत्य काय हे आपल्याला काही वेळ गेल्यांनतर कळेलही. सध्या जगामध्ये बलात्काराचे वाढते प्रमाण आहे. पुरुषी अहंकार, पुरुषत्वाशी जोडलेल्या लैंगिक भावना हे त्यामागचे मुख्य कारण. कोणताही पुरुष धडधाकट असायला हवा आणि प्रत्येक स्त्री सुंदर आणि कामुक असायला हवी, हे आपल्या समाजातले समीकरण म्हणजेच‘माणसाचे वस्तूकरण’. बरं आता फक्त पुरुषांबरोबरच महिला किंवा मुली यासुद्धा मागे नाहीत. आता दोष फक्त पुरुषांना देता येणार नाही. ही घटना घडल्याघडल्या धुरिणांनी लगेच ब्लॉग लिहून पुरुषी मानसिकतेला टीकेचे लक्ष्य केले. आता यात मुलीचा समावेश म्हटल्यावर त्यांना काय करावे हे सुचत नाही. येथे प्रश्न मुलगा किंवा मुलगी, पुरुष व महिला असा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे मुलं अशी का वागतात? 

ती मुलगी 'सिद्धार्थ' नावाने फेक अकाऊंट चालवत होती! BoiseLockerRoom ची चौकशी सुरू

जगामध्ये आपण खोलात जाऊन मानवी शरीराच्या बदलांकडे पहिले आपल्या असे लक्षात येईल की मुलं तारुण्यात येण्याचे वय फार कमी झाले आहे. १३ किंवा १४ वर्षांच्या मुला-मुलींमध्ये हे बदल घडताना दिसत आहे. आपल्याकडे साधारण १६ व्या वर्षी मुलगा किंवा मुलगी तारुण्यात येते असे समजले जाते. हे आता खूप मागे पडले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलामुलींमध्ये अनेक प्रकारचे शारीरिक-मानसिक बदल त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीत खूप फरक करणारे असतात. हे लक्षात घेण्यासाठी मुलांच्या आई वडिलांना किंवा शिक्षकांना रस नसतो. आपल्या समाजात 'सेक्स किंवा लैंगिकता' या शब्दांना इतके बदनाम समजतात की कोणाची बोलण्याची हिंमत होत नाही. मुलांना सतत काही तरी वेगळे करावे वाटणे, काही तरी हरवल्याची भावना निर्माण होणे व समाज आपल्याकडे वाईट नजरेने पाहतोय हि भावना वाढीस लागते. हे आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला असंच वाटत असेल का? असे अनेक प्रश्न त्यांचे कुतुहूल वाढवत असते. हे अनेक आपल्या पिढ्यांनी तो अनुभवाला पण याची कुठे जाहीर वाच्यता करत नव्हते. पण आजच्या समाज माध्यमे एवढी सशक्त आणि परिणामकारक असल्यामुळे ते दाबून ठेवणे अशक्य. 

पालकांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. तारुण्यात पदार्पण करणाऱ्या आपल्या पाल्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलांकडे लक्ष ठेवून  वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे बनले आहे. घरात वावरत असताना त्यांच्याशी 'लैंगिक शिक्षणाविषयी' बोलायला सुरुवात करायला हवी. पालकांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तरी ही गोष्ट त्यांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सहज मिळणार आहे. त्यापेक्षा पालकांनी त्यांच्याशी संवाद साधून मनातील न्यूनगंड दूर करायला हवा. सरकारने ही सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत कॉन्डोमच्या जाहिराती दाखवल्या जाऊ नयेत, असा नियम करण्यापेक्षा लैंगिक शिक्षणाच्या जागृतीसाठी काही योजना आखून शालेय स्तरावर कार्यक्रम सुरु करावा. यासाठी प्रयत्न झाले नाही तर अशा घटना घडत राहतील. हे आपण समाज,पालक, शिक्षक, राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था म्हणून आपले अपयश आहे. तोपर्यंत आपला मुलगा किंवा मुलगी अशा ग्रुपमध्ये अडकणार नाही याची काळजी घ्या.

bois locker room girls locker room and mentality behind all these chats read special report

loading image