
Boisar Law and Order in Spotlight as 12 Women Report Abuse Within Quarter
Sakal
-निखिल मेस्त्री
पालघर: बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे क्षेत्रात जून ते ऑक्टोबर अशा तीन महिन्यात लैंगिक शोषणाच्या तब्बल बारा तक्रारीची नोंद झाली आहे. यावरून येथे गुन्हेगारी फोफावत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे बोईसर भागात महिला असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे.