- सुमित पाटील
बोईसर : बोईसर पोलीस ठाणे हद्दित (ता. ११) स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे पथकास बोईसर पूर्व येथील रुपरजत पार्कमधील बिल्डींग नंबर २, ए विंग, रुम नंबर २०२, ता. जि. पालघर येथे काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या वेळी पालघर पाेलिसांनी २ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन ९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.