

Fatal Bike Truck Accident in Boisar
esakal
विनायक पवार
बोईसर : बोईसर-नवापूर मार्गावरील पाम टेंभी गावाच्या हद्दीत भरधाव दुचाकीने समोरील ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मोहित शर्मा, रवी गुप्ता आणि नयन महातो अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.