Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपी अल्पवयीन; शाळेच्या नोंदीतून पुष्टी

Tiger Shroff Firing case Update: अभिनेता टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन असल्याचे शाळेच्या नोंदीतून स्पष्ट झाले असून, तपासाला नवे वळण मिळाले आहे.
Tiger Shroff Firing case Update

Tiger Shroff Firing case Update

ESakal

Updated on: 

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावरील गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचे वय घटनेवेळी १८ वर्षापेक्षा कमी असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुंबईतील विशेष 'मकोका' न्यायालयाने आरोपीचा खटला पुढील कार्यवाहीसाठी बाल न्याय मंडळाकडे (जेजेबी) वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...