

Mumbai School Bomb Threat mail
ESakal
मुंबई : काही आठवड्यांपूर्वी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ मोठा बॉम्ब स्फोट झाला होता. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ पसरली असून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला होता. या घटनेनंतर मुंबईसह अनेक विमानतळ तसेच काही गजबजणाऱ्या ठिकाणी बॉम्ब ठेवला असल्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यानंतर आता पुन्हा असाच धमकीचा मेल ठाण्यातील एका नामांकित शाळेला मिळाल्याचे समोर आले आहे.