

Mumbai HC blow to Thane Udupi Swaad Restaurant
ESakal
मुंबई : निकृष्ट दर्जाचे (अॅनालॉग) पनीर वापरल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) परवाना निलंबित केलेल्या ठाण्यातील 'उडुपी स्वाद' रेस्टॉरंटला उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २१) दिलासा देण्यास नकार दिला. ग्राहकांना निकृष्ट पनीर खायला घातल्याने त्याचे परिणाम रेस्टॉरंटनेही भोगले पाहिजेत, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.