

Mumbai High Court & Amitabh Bachchan Bomb Threat
ESakal
मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईतील महापालिकेचे कार्यालयासह माझगाव, दिंडोशी आणि एस्प्लनेड येथील न्यायालयांना बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमक्या देणारे ई-मेल प्राप्त झाले होते. यामुळे शहरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर येत पोलिसांकडून तातडीने तपासणी मोहीम राबवण्यात आली. या धमकीच्या मेलला आठवडादेखील झाला नसून आता मुंबईच्या हायकोर्टाला बॉम्बने उडवणार असल्याची माहिती समोर आली आहे.