ऑफिसमध्ये महिलांकडे एकटक बघणं गुन्हा आहे की नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Bombay High Court Ruling : नैतिकता आणि कायदा यांच्यामध्ये एक सीमारेषा असते. कोणत्याही कायद्याची व्याख्या त्याच्या ठरलेल्या चौकटीबाहेर जाऊन करता येत नाही, अशी टिप्पणीही यावेळी न्यायालयाने केली.
Bombay High Court ruling

Bombay High Court ruling

esakal

Updated on

ऑफीसमध्ये महिला सहकाऱ्याकडे अयोग्य पद्धतीने बघणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आणि अपमानास्पद असलं, तरी ते भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(क) अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्याायलयातने दिला आहे. तसेच याप्रकरणी आरोपीविरोधातील गुन्हा रद्द करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. नैतिकता आणि कायदा यांच्यामध्ये एक सीमारेषा असते. कोणत्याही कायद्याची व्याख्या त्याच्या ठरलेल्या चौकटीबाहेर जाऊन करता येत नाही, अशी टिप्पणीही यावेळी न्यायालयाने केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com