नाईट लाईफची झिंग उतरवली; मुंबईतल्या चार हॉटेल्स, क्लबवर कारवाई

नाईट लाईफची झिंग उतरवली; मुंबईतल्या चार हॉटेल्स, क्लबवर कारवाई

मुंबई: महानगर पालिकेने मुंबईतील नाईट लाईफची झिंग उतरवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईतील तीन हॉटेल्ससह एका क्लबवर महानगर पालिकेने कारवाई केली आहे. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस देण्याबरोबरच वांद्रे पश्‍चिम येथील बॉम्बे अड्डा क्लबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला महापालिकेने लोअर परळ आणि वांद्रे येथील क्लबवर कारवाई केली केली होती. या दोन्ही ठिकाणी कोविड प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघनही होत होते. या दोन्ही क्लब विरोधात पालिकेने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी सर्व प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना रात्रीच्या वेळी गस्त ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच राज्य सरकारला पत्र लिहून रात्रीच्या संचारबंदीची गरज असल्याची विनंती केली होती. या प्रकारानंतरही मुंबईची नाईट लाईफ अविरत सुरु आहे.

महानगर पालिकेने रविवारी मध्यरात्री नंतर दादर येथील प्रसिध्द प्रितम हॉटेल, मालाड येथील रुड लॉंज, कांदिवली येथील भगवती हॉटेलसह वांद्रे येथील बॉम्बे अड्डा या क्लबवर धाड टाकली. तेथेही नियमबाह्य गर्दी, मास्क न वापरणे असे प्रकार आढळले. यात तीन हॉटेल्सना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसचे उत्तर आल्यानंतर हॉटेल्स साथ नियंत्रण कायदा,आपात्कालीन कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. बॉम्बे अड्डा क्लबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

560 जणांवर कारवाई, 43 हजारांचा दंड

हॉटेल पबमध्ये दंड न वापरणाऱ्यांकडून पालिकेने प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात प्रितम हॉटेल मधून 120 जणांकडून 9800 हजार, रुड लॉजमध्ये 75 जणांकडून 1000 रुपये आणि भगवती हॉटेल मधून 90 जणांकडून 2400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. बॉम्बे अड्ड क्लब मध्ये सर्वात मोठी कारवाई झाली असून येथे 275 जणांकडून 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bombay municipal corporation action against four big hotels club mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com