esakal | ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर

बोलून बातमी शोधा

Thane Municipal Corporation

महापालिका आस्थापनेवरील 7 हजार 91 कायम अधिकारी कर्मचारी, एकत्रित मानधनावरील 262 कर्मचारी, शिक्षण विभागातील एकूण 1 हजार 47 कर्मचारी आणि परिवहन सेवेतील 1 हजार 850 कर्मचाऱ्यांना यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर
sakal_logo
By
राजेश मोरे

ठाणे : ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 15 हजार 500 रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी केली. 

हे ही वाचाः  विम्याची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, चौघांना अटक

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विरोधी पक्षनेत्या प्रमिला किणे, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, म्युनिसिपल युनियनचे नेते रवी राव, अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या वर्षी 15 हजार 500 रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

अधिक वाचाः  अर्णब गोस्वामींना अटक केल्यानं राज्य सरकारचे आभार; अन्वय नाईक कुटुंबियांचे तत्कालीन व्यवस्थेवर गंभीर आरोप

महापालिका आस्थापनेवरील 7 हजार 91 कायम अधिकारी कर्मचारी, एकत्रित मानधनावरील 262 कर्मचारी, शिक्षण विभागातील एकूण 1 हजार 47 कर्मचारी आणि परिवहन सेवेतील 1 हजार 850 कर्मचाऱ्यांना यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण 16 कोटी इतका खर्च होणार आहे. दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले. 

(संपादन : वैभव गाटे)

bonus announced for Thane Municipal Corporation employees