
घाटकोपर : गणपती बाप्पाच्या उत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. भारत-पाक सीमेवरील पूंछ गावात ‘बॉर्डरचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा श्री गणेशाचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पूंछकडे घेऊन जाण्यासाठी ही गणेशमूर्ती सोमवारी (ता. १८) सकाळी सात वाजता मुंबईतील बांद्रा स्थानकावरून स्वराज्य एक्स्प्रेसने रवाना करण्यात आली. विद्याविहार येथील श्री गणेश चित्रशाळेतून तयार झालेली ही मूर्ती वाजतगाजत आणण्यात आली.