पोलिसांची पोलिसांवरच कारवाई! नक्की 'त्यांचं' काय चुकलं वाचा...

पोलिसांची पोलिसांवरच कारवाई! नक्की 'त्यांचं' काय चुकलं वाचा...

मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला गेला. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. पोलिस, डॉक्टर, पालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी अशांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन कोरोनासारख्या संकटाचा सामना केला. अशातच समोर आलेल्या माहितीनुसार, बोरिवली पोलिस ठाण्यात कामावर गैरहजर राहणाऱ्या 6 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 145 महाराष्ट्र पोलिस कायदा सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 56 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना कामावर हजर राहण्याचं आदेश देण्यात आले. मात्र वारंवार कामावर हजर राहण्यासाठी सांगूनही हे सहा पोलिस कामावर गैरहजर राहिले. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्म चाऱ्यांच्या सुट्या या रद्द करण्यात आल्या असून त्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. 

दरम्यान कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एका महिला पोलिसाचाही समावेश आहे. विना परवानगी गैर हजर राहिलेल्या प्रकरणी या पूर्वी राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) 17 जवानांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि राज्य राखीव पोलिस अधिनियमांतर्गत वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसंच बेस्टनं देखील आपल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रान्सपोर्टनं (BEST) 14 वाहनचालक आणि कंडक्टर यांना कामावर हजर न राहिल्यानं बडतर्फ केलं आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून राज्यात पोलिस कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका साकारत आहे.  आधीच पोलिस आयुक्तांनी 55 वर्षावरील पोलिसांना कोरोना प्रादुर्भावामुळे घरी बसवले आहे. त्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काही पोलिस गैरहजर राहिल्यामुले उर्वरित पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण वाढत आहे.

अखेर गुन्हा दाखल 

नोटीस बजावून देखील अशाप्रकारच्या संकटाच्या काळात गैरहजर राहणाऱ्या 6 पोलिस कर्मचाऱ्यांवर बोरिवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा 1951, चे कलम 145 आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005 कलम 56 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक पोलिस नाईक आणि पाच पोलिस शिपायांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका महिला पोलिस शिपायाचाही समावेश आहे. काही कर्मचारी कोरोना सुरू होण्यापूर्वीपासूनही सेवेत गैरहजर आहेत.

कधीपासून गैरहजर 

कारवाई केलेल्यांमध्ये प्रियंका चव्हाण 27 डिसेंबर 2018 पासून अनुपस्थित आहेत. प्रदीप आगवणे हे 2 ऑगस्ट, प्रशांत भोसले 14 फेब्रुवारी, हरिशचंद्र भोसले 16 ऑगस्टपासून विश्वनाथ नामदार हे 23 एप्रिलपासून, प्रदीपकुमार बाबर 31 मार्च ते 10 ऑगस्ट असे 72 दिवस त्यानंतर पुन्हा 16 ऑगस्टपासून कामावर गैरहजर आहेत, असं नमूद करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com