esakal | कोरोना काळात केलं लग्न पण अवघ्या तीन दिवसातच झालं असं काही...बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का..
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

 अनेकांनी कोरोना काळातही विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच वराला महाभयंकर संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे.  

कोरोना काळात केलं लग्न पण अवघ्या तीन दिवसातच झालं असं काही...बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यात कोरोनाग्रस्तांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. मिशन बिगिन अगेनअंतर्गत आता लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये लग्नसमारंभांनाही परवानगी देण्यात आली आहे मात्र त्यात 50 पेक्षा जास्त जण नको असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

त्यामुळे अनेकांनी कोरोना काळातही विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच वराला महाभयंकर संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे.  

हेही वाचा: काँग्रेसचा बडा नेता म्हणतोय, मलाही आत्महत्या करायचे विचार यायचे...

 लग्न केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात वराला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलंय. त्यामुळे वधू तसेच लग्नाला उपस्थित असलेल्या 63 जणांचं विलगीकरण करण्यात आलं आहे.
 

हेही वाचा: मोठी बातमी! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; बाप्पाची मूर्ती घडणार मंडपातच...

लॅबोरटरी टेक्निशियन असलेल्या या बावीस वर्षीय युवकानं लग्नापूर्वी कोरोना चाचणी केली होती मात्र ती निगेटिव्ह आली होती. मात्र जव्हार तालुक्यात झालेल्या या लग्नानंतर त्यानं पुन्हा चाचणी केली. यावेळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे लग्नात आलेल्या तब्बल ६३ लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आलंय असं जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी सांगितलयं.

हेही वाचा: राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी! दिवसभरात 5 हजारहून अधिक रुग्ण 'कोरोनामुक्त'

आता वरास कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यामुळे वधूसह लग्नास उपस्थित असलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवणं भाग पडलं आहे. पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 हजार 911 रुग्णांची नोंद झाली आहे तसेच 61 जणांचे कोरोनामुळे निधन झालं आहे.

a bridegroom from palghar tested corona positive just within 3 days of wedding 

loading image
go to top