
BMC Housing Lottery
ESakal
मुंबई : दिवाळी सण तोंडावर आला असून त्यानिमित्त पालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र घरांच्या वाढत्या किंमती पाहता ते शक्य होत नाही. मात्र अशाच नागरिकांसाठी पालिकेने आनंदाची बातमी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मुंबईकरांसाठी खास दिवाळीची भेट ठरणार आहे.