समुद्रकिनारी छटपूजा कार्यक्रमांवर बंदी, मुंबई मनपाने जारी केली नियमावली

समुद्रकिनारी छटपूजा कार्यक्रमांवर बंदी, मुंबई मनपाने जारी केली नियमावली

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या छटपूजेसाठी मुंबई महापालिकेने नियमावली जारी केली आहे. २० आणि २१ नोव्हेंबररोजी छटपूजा सणाच्या निमित्ताने आणि निर्माल्य विसर्जीत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने येत असतात. अशात यंदा कोरोनाची महामारी असल्याने कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविडची दुसरी लाट येणाची असलेली शक्यता लक्षात घेऊन, तसेच समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी छटपूजा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. 

समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी सोशल डिस्टंसिंगचे पालन होणार नाही असं वाटत असल्याने यंदा छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणा-या आयोजनांवर बंदी घालण्यात येत असल्याचं पालिकेने सांगितलंय.

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा विविध सण साजरे करताना नागरिकांनी सोशल दिसतानसिंग पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे इत्यादीबाबत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य छटपूजेच्या वेळी देखील करावे आणि बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.  

काय आहे नियमावली ? 

  • समुद्रकिनारी छटपूजेस होणारी गर्दी लक्षात घेता ‘कोविड – १९’ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सोशल डिस्टंसिंगचे पालन होणार नाही, त्यामुळे समुद्रकिनारी सामूहिक छटपूजेची परवानगी देण्‍यात येणार नाही. त्‍यामुळे अशा ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत, याची पोलिस विभागाने दक्षता घ्‍यावी.
  • छटपूजेसाठी सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या विभाग स्तरावरुन देण्यात येतील.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी स्थानिक पातळीवर पोलिस विभागाची मदत घेण्यात यावी, तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विभाग स्तरावर ‘कोविड – १९’ करिता वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे आणि आवश्यकतेनुसार भाविकांची चाचणी (Antigen / RT PCR Testing) करण्यात यावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावे.
  • अशा ठिकाणी ध्वनि प्रदूषण होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्‍लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

bruhanmumbai municipal corporation guidelines for chhat puja 2020

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com