छटपुजेसाठी महानगर पालिकेकडून दोन दिवसात येणार नियमावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छटपुजेसाठी महानगर पालिकेकडून दोन दिवसात येणार नियमावली

छटपुजेसाठी मुंबई महानगर पालिकेकडून दोन दिवसात नियमावली तयार केली जाण्याची शक्यता आहे.

छटपुजेसाठी महानगर पालिकेकडून दोन दिवसात येणार नियमावली

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : छटपुजेसाठी मुंबई महानगर पालिकेकडून दोन दिवसात नियमावली तयार केली जाण्याची शक्यता आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी छट पुजा होणार असून तलाव आणि समुद्र किनाऱ्यावर छट पुजा केली जाते.

भाजपच्या शिष्टमंडळाने आज महापालिका अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांची भेट घेऊन छट पुजेसाठी नियमावली तयार करुन परवानगी देण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

महत्त्वाची बातमी : "खेळ तर आता सुरु झाला आहे उद्धव ठाकरे", जेलमधून बाहेर आल्यानंतर अर्णब यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारने 100 पेक्षा कमी माणसांच्या उपस्थीतीत कार्यक्रम करण्यास परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवासाठी कृत्रिम हौद बांधले होते त्याच प्रमाणे छट पुजेसाठी हौद तयार करुन सामाजिक अंतर पाळून राज्य सरकारच्या निर्णयानुसार 100 पेक्षा कमी माणसाच्या उपस्थीतीत छट पुजेला परवानगी द्यावी अशी मागणी केली.

यावर पालिकेकडून दोन दिवसात नियमावली तयार करण्याचे आश्‍वासन देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले असल्याचे भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले. या शिष्टमंडळात आमदार मिहीर कोटेचा, नगरसेवक विनोद मिश्रा, शिरसाट यांच्यासह भाजप उत्तर भारत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे, छटपुजा आयोजक अमरजीत मिश्रा उपस्थीत होते.

महत्त्वाची बातमी : पालिकेने केलं शुल्क माफ, मात्र पार्किंग ठेकेदारांकडून वाहन चालकांची पाकीटमारी सुरूच

बिहार आणि उत्तर प्रदेशात सुर्यांची उपासना केली जाते. गेल्या काही वर्षात मुंबईतही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून सर्वच राजकीय पक्षांकडून त्याला पाठबळही मिळत आहे.

bruhanmumbai municipal corporation to issue guideline for chhat puja in two days

loading image
go to top