शिवसेनेची वाढली धाकधुक, काँग्रेस निर्णायक स्थितीत; भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेचं लक्ष 

शिवसेनेची वाढली धाकधुक, काँग्रेस निर्णायक स्थितीत; भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेचं लक्ष 

मुंबई महापालिकेच्या समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रीया उद्यापासून सुरु होत आहे. सर्व समित्यांच्या निवडणुका लढणारचं अशी भुमिका कॉग्रेसने घेतली आहे. तर, भाजपकडून अद्याप निर्णय न झाल्याने भाजप काय भुमिका घेणार यावर  शिवसेनेचे लक्ष आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदाची निवडणुक 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्यात येणार आहेत." सर्व समित्यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुका लढणार आहोत." असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. तर, भाजपकडून अद्याप भुमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. भाजपकडून आयत्यावेळी कॉग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा देण्याची भुमिका स्विकारल्यास शिवसेनेला पराभव स्विकारावा लागेल. अशी टांगती तलवार शिवसेनेवर प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत कायम राहाणार आहे.त्यामुळे कॉग्रेस आता निर्णायक भुमिकेत आली आहे.

सातमकर पुन्हा शिक्षण समिती अध्यक्ष ?

शिवसेनेच्या शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांच्या जागी मंगेश सातमकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार आहे. तर, स्थायी समिती अध्यक्षपदाची उमेदवारी विद्यामान अध्यक्ष  यशवंत जाधाव यांनाच मिळण्याची शक्यता आहे.

( संपादन -  सुमित बागुल )

bruhanmumbai municipal corporation standing committee elections detail report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com