Kandivali Building Slab Collaps
Kandivali Building Slab CollapsESakal

Building Slab Collaps: कांदिवलीत इमारतीचा स्लॅब कोसळला; दुरुस्तीचे काम सुरू असताना घटना, काही मजूर जखमी

Kandivali Building Slab Collaps: कांदिवलीत इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. यात काही मजूर जखमी झाले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
Published on

कांदिवली पश्चिमेतील मजेठिया नगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. या परिसरात असलेल्या एका चार मजली जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेत तिघेजण जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमींपैकी एका मजुराच्या पायाला गंभीर इजा झाली असून फ्रॅक्चर झाले आहे. उर्वरित दोघेजण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com