

मुंबई : परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या जळीत रुग्ण उपचार केंद्राचे (बर्न केअर सेंटर) लोकार्पण शनिवार (ता.१३) रोजी शैलेश लिमडी यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामध्ये जळीत रुग्णांसाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, महिला व बालकांसह आता पुरुष रुग्णांनाही उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. या केंद्रामार्फत वर्षाला सुमारे १५० ते १७० जळीत रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. लोकार्पण सोहळ्यास केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.संगीता रावत,प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनीता पुरी, तसेच रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.