खोपोलीजवळ वेगात आलेल्या बसची दुचाकीला धडक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

एक जण जागीच ठार 

खोपोली : खोपोली गाव ते शीळफाटा महामार्गावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसटी बस व दुचाकीचा भयंकर अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. अशोक पाटील आपल्या पत्नीसह अलिबागवरून मळवली (लोणावळा) येथे दुचाकी क्रमांक एमएच 14 ईटी 4916 ने परतत होते. खोपोली आणि शिळफाट्यादरम्यान मुंबई पुणे महामार्गावर त्यांना समोरून येणाऱ्या खोपोली-पनवेल एसटी बसने धडक दिली. 

हेही वाचा - शीव उड्डाणपूल आजपासून बंद

या अपघातात अशोक पाटील (46) हे जागेवरच मृत्युमुखी पडले; तर त्यांच्या पत्नी मात्र सुखरूप आहेत. अशोक पाटील हे मूळचे भुसावळचे रहिवासी असून सध्या ते नोकरीनिमित्ताने मळवली (लोणावळा) येथे वास्तव्यास होते. याबाबत खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. 

नागरिक संतप्त 

शीळफाटा-खोपोली गाव दरम्यान महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी या महामार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. तसेच प्रतिकिमी 20 पेक्षा अधिक वेग न ठेवण्याचे सूचनाफलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. अशा स्थितीतदेखील एसटी बसच्या माध्यमातून अपघात घडल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. 
 

web title : Bus and bike accident on Khopoli Highway


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus and bike accident on Khopoli Highway