शीव उड्डाणपूल आजपासून बंद!  सोमवार पहाटेपर्यंत पहिला ट्रॅफिक ब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शीव येथील उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता. 14) पहाटे 5 वाजल्यापासून 17 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजेपर्यंत हा पूल बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर 6 एप्रिलपर्यंत आठवड्यातून चार दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. दक्षिण मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपूल बंद राहणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - तिसरी खासगी एक्सप्रेस महाशिवरात्रीपासून

शीव उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेऊन बेअरिंग बदलण्याचे काम आठवड्यातील चार दिवस करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने आठ ट्रॅफिक ब्लॉक मंजूर केले आहेत. त्यातील पहिला ब्लॉक 14 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता सुरू होणार असल्याचे एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले. मुंबई आयआयटीने 2017 मध्ये शीव उड्डाणपुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून बेअरिंग बदलण्याची शिफारस केली होती. 

मनसेने राजमुद्रा वापरल्याबद्दल निव़डणूक आयोगाची नोटीस

पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एक्‍सपान्शन जॉईंट्‌स बदलले जातील; तसेच डांबरीकरण केले जाईल. त्यासाठी सलग 20 दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. महामुंबईला मुंबई शहराशी जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे. 

पर्यायी रस्ते 
- उपनगरातून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी : पूर्व उन्नत मार्ग, वडाळा टीटी मार्ग. 

ट्रॅफिक ब्लॉक कधी? 
- 14 फेब्रुवारी पहाटे 5 ते 17 फेब्रुवारी पहाटे 5 
- 20 फेब्रुवारी रात्री 10 ते 24 फेब्रुवारी सकाळी 6 
- 27 फेब्रुवारी रात्री 10 ते 2 मार्च सकाळी 6 
- 5 मार्च रात्री 10 ते 9 मार्च सकाळी 6 
- 12 मार्च रात्री 10 ते 16 मार्च सकाळी 6 
- 19 मार्च रात्री 10 ते 23 मार्च सकाळी 6 
- 26 मार्च रात्री 10 ते 30 मार्च सकाळी 6 
-2 एप्रिल रात्री 10 ते 6 एप्रिल सकाळी 6 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first traffic block from Shiv bridge