Mumbai News : केबल चोरीच्या प्रयत्नाने सिग्नल यंत्रणा ठप्प; पनवेल-वाशी मार्गावरील लोकल सेवा दोन तास विस्कळित; सायंकाळच्या गर्दीत हजारो प्रवासी अडकले

पनवेल परिसरात रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी संबंधित केबल कापून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पनवेल-वाशी सेक्शनमधील अप आणि डाउन मार्गावरील सिग्नल यंत्रणा पडली ठप्प.
Mumbai Local

Mumbai Local

sakal

Updated on

मुंबई - पनवेल परिसरात रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी संबंधित केबल कापून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पनवेल-वाशी सेक्शनमधील अप आणि डाउन मार्गावरील सिग्नल यंत्रणा ठप्प पडली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे अनेक लोकल गाड्या खोळंबल्या, तर काही गाड्या विलंबाने धावल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर रात्री आठच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com