

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नईतून ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला आज अंधेरी सेशन्स कोर्टात दाखल केलं होतं. कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत २३ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान ललित पाटील काही दिवसांपुर्वी पोलिसांच्या ताब्यातून पळाला त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी ललीत पाटीलला कसं गाठलं याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी कसं गाठलं ललीत पाटीलला
नाशिक ड्रगसाठा प्रकरणी अनेक लोकांना साकीनाका पोलिसांनी अटक केली होती. मात्र पोलिसांनी अनेक नावे गोपनीय ठेवली होती. मीडिया रिपोर्टवरून ललित पाटीलचा असा समज झाला की, त्याचे काही महत्त्वाचे साथीदार पोलिसांना चकवा देऊन पसार झाले आहेत.
त्यानंतर त्याने एका अनोळखी नंबरवरून आपल्या एका साथीदाराला संपर्क केला. मात्र, तो साथीदार पोलिसांच्या कोठडीत असल्याने ललित पाटीलचा हा अनोळखी नंबर पोलिसांच्या रडावर आला. अटकेत असलेल्या साथीदाराशी बोलताना ललितला देखील त्याचा साथीदार पोलीस कोठडी असल्याचा संशय न आल्याने तो गाफील राहिला.
त्यानंतर साकीनाका पोलीसांनी प्रचंड गोपनीयता बाळगून तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे संभाषणावरून पोलिसांना ललित पाटीलची माहिती मिळत होती. दरम्यान पोलिसांनी ललित पाटीलचा अनोळखी नंबर ट्रेस करून बेंगलोरवरून चेन्नईला पळताना त्याला अटक केली.
ललित पाटीलने कसा केला पुणे ते चेन्नई प्रवास?
पुण्यातून पसार झाल्यानंतर ललित पाटील एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने दोन सहकाऱ्यांसह आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरूला गेला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतलं.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
अॅड. अमित मिश्रा यांनी सांगितलं की, "आरोपीनं कोर्टासमोर सांगितलं की पुणे पोलिसांकडून त्याच्या जीवाला धोका आहे. आरोपीच्यावतीनं ज्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची विनंती केली.
पण साकीनाका पोलिसांच्यावतीने सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, "हे मोठं ड्रग्ज रॅकेट असून यामध्ये १२ आरोपी आहेत. यामध्ये बाराव्या आरोपीला अटक झाली आहे. या बाराव्या आरोपीनं पोलीस चौकशीत सांगितलं की, ड्रग्ज बनवण्यासाठीचा आपण कच्चा माल भूषण पाटील याच्या नाशिकमधील कारखान्याला पुरवत होतो. यामध्ये ललित पाटीलचा देखील समावेश असून तो रुग्णालयातून हे रॅकेट चालवत होता".
दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत न्यायाधिशांनी ललित पाटीलला सोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.