esakal | गणेशोत्सवात ; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नालासोपा-यातील धणीवगावच्या तरुणांचा आदर्श उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गणेशोत्सवात ; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नालासोपा-यातील धणीवगावच्या तरुणांचा आदर्श उपक्रम

sakal_logo
By
विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा :- कोरोना (Corona) महामारीच्या सावट खालीच यंदाचाही गणेशोत्सव साजरा होत आहे. या गणेशोत्सव मध्ये गावात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नालासोपाऱ्यातील धणीवगावच्या (Dhanivagaon) युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक गाव, एक घर, एक गणपती ही संकल्पना राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

गावातील 5 दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून, माजी नगरसेवक पंकज पाटील यांच्या घरात 5 दिवसाच्या घरगुती गणरायाची मूर्तीस्थापना केली आहे. पाटील कुटुंबीय दरवर्षी दीड दिवसाचा घरगुती गणपती बसवत होते. यंदाचे त्यांचे 25 वे रौप्य महोत्सव वर्षे आहे आणि याच दिवसाचे औचित्य साधून, गावक-यांची एकीचे स्वागत करत, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी आपल्या घरात 5 दिवसाच्या गणरायाची स्थापना केली आहे. आज शुक्रवार ता 10 रोजी गणेशचतुर्थी निमित्त सकाळी 8 वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, दुपारी 12 वाजता घरात सोशल डिस्टन्स ठेवून सार्वजनिक आरती केली. कोरोनाचे सर्व नियम पाळून, बाप्पाची भक्तिभावाने धणीवचे गावकरी पुढचे 5 दिवस सेवा करणार असल्याचे गावक-यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवात कोरोना टेस्ट करून घ्या; पोलिसांचं मंडळांना आवाहन

कोरोना महामारीने अनेकांचे जीव गेले आहेत. गणेशोत्सव हा सर्वांसाठी श्रद्धेचा आणि भक्तीभावाचा आहे. याचमुळे आमच्या धणीवगावाच्या तरुण कार्यकर्त्यांनी गावातील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गावातील 5 दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून, घरगुती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यातून बाप्पाची भक्ती होईल, कोरोना संसर्ग टळेल, आणि आम्ही गावकरी सुखरूप राहू असा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे माजी सभापती पूर्वा पाटील यांनी सांगितले आहे.

loading image
go to top