

Mulund Car Accident
ESakal
मुलुंड : मुलुंड पश्चिमेतील एसीसी रोड परिसरात गुरुवार (ता. २८) सायंकाळी भीषण अपघात घडला. सोसायटीच्या आवारातून बाहेर पडणारी कार अचानक अनियंत्रित झाल्याने ही कार फुटपाथवर उभ्या असलेल्या नागरिकांना धडकली. यामध्ये कारखाली चिरडून एका महिलेसह दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.