esakal | भाईंदर : महागडे कारटेप चोरणारी आंतरराज्य टोळी अटकेत | Robbery
sakal

बोलून बातमी शोधा

thief arrested

भाईंदर : महागडे कारटेप चोरणारी आंतरराज्य टोळी अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

भाईंदर : कारमधील महागडे टेप चोरणाऱ्या (Car tape robbery) आंतरराज्य टोळीला भाईंदर पोलिसांनी (bhayandar police) अटक केली आहे. या टोळीला सुरुवातीला गोवा पोलिसांनी अटक केली होती. तपासणीत आरोपींनी भाईंदर परिसरातही चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपींचा ताबा भाईंदर पोलिसांनी घेतला. पोलिसांनी आरोपींकडून चोरण्यात आलेले लाखो रुपये किमतीचे बारा कारटेप हस्तगत केले असून तीन जणांना (culprit arrested) अटक केली आहे.

हेही वाचा: दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

जुबेर रईस अहमद (नालासोपारा), जगन्नाथ रामनाथ सरोज (नालासोपारा) आणि प्रदीप रवळनाथ गुरव (कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील जुबेर आणि जगन्नाथ या दोघांवर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यातही कार टेप चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
आरोपी गोवा हद्दीत कार टेप चोरी करून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना सीमा भागात त्यांना गोवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत भाईंदरमध्येही अनेक कारटेप चोरी केल्याचे स्पष्ट झाले, मात्र आरोपींनी भाईंदरमध्ये चोरी केलेला मुद्देमाल पोलिस हस्तगत करू शकले नव्हते.

हेही वाचा: दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

आरोपींचा ताबा भाईंदर पोलिसांनी घेतला आणि त्यांना चौकशीसाठी भाईंदरला आणले. भाईंदरमध्ये एकंदर बारा कारटेप चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. चोरी झालेल्या ठिकाणच्या सीसी टीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी याची खातरजमा केली आहे. आरोपींकडून चोरलेले सर्व कारटेप हस्तगत करण्यात आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक विजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रदीप गवळी पुढील तपास करत आहेत.

loading image
go to top