Mumbai Crime : एटीएसच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या म्हणजेच एटीएसच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
crime news
crime newssakal

मुंबई - राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या म्हणजेच एटीएसच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्र्वास पाटील यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी संबंधित महिलाने याबाबत पोलीस अधिकारी यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर सदरच्या अधिकाऱ्याविरोधात पोलिसांनी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान अत्याचार व ब्लॅकमेलिंग करत असल्याचे समोर आले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, सन 2020 मध्ये एपीआय विश्र्वास पाटील यांनी एका तपास कामाच्या अनुषंगाने मदत करणाऱ्या महिलेसोबत ओळख वाढवून तिला थंड पेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा पिडीत महिलेनं आरोप केला आहे. पुढे याचे रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा महिलेचा दावा आहे.

दरम्यान या सर्व गोष्टींना कंटाळून या महिलेने पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या प्रकरणी पुढील तपास आझाद मैदान पोलीस करीत आहेत.सदरचा बलात्कार हा शिवाजी पार्क परिसरात केला आहे.

दरम्यान याबाबत पाटील हे ज्या खंडणी विभागात काम करत होते. त्याच मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलच्या निरीक्षक महिलेने तक्रार केल्यानंतर तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तक्रार करु नका असे सांगण्यात आल्याची माहिती आझाद मैदान पोलीस स्टेशन मधील एका अधिकाऱ्यानी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com