esakal | ...अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल मात्र माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता फरार
sakal

बोलून बातमी शोधा

...अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल मात्र माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता फरार

...अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल मात्र माजी भाजप आमदार नरेंद्र मेहता फरार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मीरा भाईंदर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात आज पहाटे 3.35 वाजता बलात्कार त्याचसोबत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा रोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी गुन्हा कधी नोंदवला जाणार याची वारंवार चर्चा होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले होते. 

मोठी बातमी - भीषण ! ३२ वार करत पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीचा खेळ केला खल्लास...

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचावर लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचसोबत नरेंद्र मेहता यांचे सहकारी संजय थरथरे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मेहता यांचा एक असतील व्हिडीओ व्हायरल झालेला. यानंतर नरेंद्र मेहता यांनी २४ फेब्रुवारी रोजी फेसबुकवर पोस्ट टाकत आपण पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हंटलं होतं. माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये असं मला वाटतं. राजकीय प्रवासात अनेकांची संबंध आला, या सर्वांची माफी मागतो असं देखील नरेंद्र मेहता म्हणाले होते.

मोठी बातमी - तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या!

आईपीसी कलम 376 (2) (n) ,376 (2),496,417,232,504,506,34, तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार कायदा 3(1)(w), अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 3(s), अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायदा 3(2)(5) अन्वये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मेहता फरार असल्याचं समजतंय.

case registered against ex mla of bjp narendra mehata under IPC at mirarod police station

loading image