Mumbai News : व्हिडीओ बनवताय...जरा सांभाळून, लोकलमध्ये रिल्स बनवल्यास हाेणार गुन्हा दाखल

धावत्या लोकलमध्ये रिल्स, व्हिडीओ बनविणे हा कायदेशीर गुन्हा; रेल्वे नियमानुसार दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षेची तरतूद
case will filed if reels made in mumbai local train social media railway
case will filed if reels made in mumbai local train social media railway Sakal

नितीन बिनेकर

मुंबई : धावत्या लोकलसह लांब-पल्याच्या रेल्वे गाड्या किंवा प्लॅटफॉर्मवर रिल्स, सेल्फी, व्हिडिओ रेकॉर्ड करणे ही आजकाल एक सामान्य गोष्ट झाली आहे. विशेषतः युट्युबरसाठी आवडता रेल्वे गाड्या आणि रेल्वे परिसर डेस्टिनेशन बनले आहे. मात्र, असे व्हिडीओ चित्रीकरण करणे म्हणजे विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करण्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा असल्याची माहिती रेल्वेने सकाळला दिली आहे.

नुकताच धावत्या लोकलमध्ये बेली डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मुंबईकरांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत .तर काही प्रवाशांनी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई कऱण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर रेल्वेने असे व्हिडीओ काढणाऱ्यावर नजर ठेवणे सुरू ठेवले आहे.

धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला प्रवास करताना सेल्फी घेणे, रील्स बनविणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे, एखाद्याचा जीव धोक्यात घालणे, रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार दोषी मानले जाते. ज्या अंतर्गत किमान एक हजार रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याच वेळी, जर तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मच्या काठावर पिवळी लाईन ओलांडली तर ५०० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला महिनाभर तुरुंगवास भोगावा लागू शकतो. रेल्वे कायद्याच्या कलम १४७ नुसार रेल्वे रुळ ओलांडणे हा देखील गुन्हा आहे.

case will filed if reels made in mumbai local train social media railway
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबाबत कोकणवासीयांना बांधकाम मंत्र्यांचे भावनिक पत्र!

व्हिडीओ काढता येते का ?

धावत्या ट्रेनमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर चित्रीकरण करता येते नाही.चित्रीकरणासाठी रेल्वे प्रशासनाची कायदेशीर अनुमती घ्यावी लागते. रेल्वेला काय चित्रीकरण करत आहात त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानंतर रेल्वे तुम्हाला अनुमती देऊ शकते.

चित्रीकरणासाठी अनुमती !

पब्लिक रिलेशन मॅन्युअलं पॉलिसी २००७ नुसार, चित्रीकरण करण्याची अनुमती दिली जाते. यासाठी रेल्वे चित्रीकरण करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीकडून नियमानुसार रक्कम वसूल करते. याशिवाय चित्रीकरण करते वेळी सुरक्षा सुद्धा प्रदान केली जाते. विशेष म्हणजे चित्रीकरणाच्या विषय, संवादाची संपूर्ण माहिती चित्रीकरणाच्या अगोदरच रेल्वेला कागदोपत्री सादर करावीत लागते. त्यानंतर रेल्वे त्याची पडताळणी केल्यावर चित्रीकरनाची अनुमती दिली जाते.

case will filed if reels made in mumbai local train social media railway
Atul Kulkarni Reel: "मारलं की मरायचं असतं"; अभिनेता अतुल कुलकर्णीचं अस्वस्थ करणारं रील

शिक्षाची अशी आहे तरतुद ?

विना परवानगी रेल्वे गाड्या किंवा रेल्वे परिसरात चित्रीकरण केल्यास आणि सोशल मीडियावर ते चित्रीकरण प्रदर्शित केल्यास

रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ नुसार कारवाई केली जाते. या कारवाईत चित्रीकरण करण्यात आलेल्या साहित्य अर्थात कॅमेरा, मोबाईल जप्त केला जातोय. तसेच रेल्वे नियमानुसार, दोषी व्यक्तीवर किमान एक हजार रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास होऊ शकते.

तुमच्या व्हिडिओवर आता रेल्वेचे लक्ष ?

रेल्वे सुरक्षा दलाकडून आशा चित्रीकरणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्व प्रथम सोशल मीडियावर व्हारल होणाऱ्या व्हिडिओवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच धावत्या रेल्वे गाड्यात किंवा रेल्वे परिसरात असे व्हिडीओ करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने दिली आहे.

धावत्या लोकलमध्ये असे व्हिडीओ काढण्यास बंदी आहे. रेल्वे प्रवाशांना आवाहन आहे की, रेल्वे गाड्यात आणि रेल्वे परिसरात असे डान्स करू त्यांचे चित्रीकरण करू नयेत. अन्यथा रेल्वेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- डॉ.शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com