

Cash Video Controversy Accusations Rise Inside Mahayuti Against Tatkare
Esakal
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शेअर पैशांच्या बंडलाचे फोटो पोस्ट करत आमदार कोण असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांना विचारल्यानं खळबळ उडाली आहे. आता यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अंबादास दानवेंनी शेअर केलेल्या व्हिडीओवरून महायुतीतच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तो मी नव्हेच असं स्पष्ट केलंय. तर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावर खळबळजनक असा दावा केलाय.