esakal | कोरोना रुग्णांमध्ये अडकलेल्या तिची मदतीची हाक
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्णांमध्ये अडकलेल्या तिची मदतीची हाक

भारतात असणाऱ्या वडिलांना पाठविला व्हिडोओ 

कोरोना रुग्णांमध्ये अडकलेल्या तिची मदतीची हाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड ः चीनमधून जन्माला आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये आतापर्यंत हजारोंना याची लागण झाली असून तब्बल १४०० हून अधिक जण मृत्यूमूखी पडले आहेत. चीनसह हा रोग जगभरातील देशांमध्ये पसरत असून जपानमध्येही या रोगाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - चीनमध्ये दीड हजार डाॅक्टरांना कोरोनाची लागण

चीनमधून जपानमध्ये आलेल्या डायमंड प्रिन्सेस या बोटीवर देखील कोरोनाची दहशत पसरली असून बोटीवरील ३०० हून अधिक प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. याच बोटीवर एक भारतीय मुलगी सोनाली देखील असून ती मदतीसाठी भारत सरकारकडे याचना करत आहे. जपान येथील डायमंड प्रिन्सेस बोटीवर कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांसोबत अडकलेल्या मिरा रोड येथील सोनाली ठक्कर नामक तरुणीने आपल्या सुटकेसाठी भारत सरकारकडे मदतीची याचना केली आहे. या बोटीवरील एकूण 318 जणांना चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे सोनालीने भारत सरकारकडे मदतीची याचना केली आहे. सदर बोट चीनमार्गे जपानकडे गेली होती.

हेही वाचा - कोरोनाचा उद्रेक कायम, मृतांची संख्या १३०० वर

सोनालीला दहा तारखेपासून ताप, सर्दी, खोकला झाला होता. तिची तपासणी केल्यानंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सोनालीला व्हायरसची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले, तिने मदतीसाठी वडिलांना व्हिडीओ पाठवला आहे. 


web title : indian girl sonali thakkar in Japan Seeking for help

loading image
go to top