esakal | मुंबईत क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी दिल्लीतील CBI पथक उचलणार अशी पावलं
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी दिल्लीतील CBI पथक उचलणार अशी पावलं

आज CBI ची टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तातडीने तपास होणार आहे . 

मुंबईत क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी दिल्लीतील CBI पथक उचलणार अशी पावलं

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चं दहा अधिकाऱ्यांचं पथक आज संध्याकाळी मुंबईत दाखल होतंय. हे सर्वजण पुढील सात दिवसांसाठी मुंबईत असणार आहेत अशी माहिती समोर येतेय. आज संध्याकाळी ७ ते साडे सातच्या सुमारास हे CBI पथक मुंबईत पोहोचणार आहे.

गेल्या वेळेप्रमाणे पुन्हा एकदा तपास अधिकाऱ्यांना क्वारंटाईन व्हायला लागू नये म्हणून या टीमला सात दिवसांच्या आतील रिटर्न तिकीट दाखवावं लागणार आहे. दरम्यान क्वारंटाईन व्हायचं नसल्यास मुंबई महापालिकेकडून 'क्वारंटाईन एक्झम्शन' घ्यावं लागणार आहे.  

मोठी बातमी - सुशांत सिंह तपास प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार CBI ने मुंबई महापालिकेत क्वारंटाईन एक्झम्शनसाठी अर्ज केलेला आहे. मात्र त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि या पार्श्वभूमीवर CBI च्या पथकाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. म्हणजे दिल्लीतून येणारी टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर ७ दिवसांनी पुन्हा माघारी जाईल. त्यानंतर पुन्हा हे पथक मुंबईत तपस करेल. जोपर्यंत मुंबई महापालिकेकडून एक्झम्शन मिळत नाही तोपर्यंत असंच करण्यात येणार असल्याचं देखील समजतंय. महापालिकेकडून याबाबत क्वारंटाईनबाबत एक्झम्शन मिळालं तर मात्र CBI अधिकारी मुंबईतून माघारी परत न जाता पुढे त्यांचं काम सुरु ठेवतील. 

पाणीपुरी, भेळपुरीच्या गाड्या खुणावतायत ? मसाला डोसे आठवतायत ? थांबा, आधी ही बातमी वाचा

 पाच टीम्स करणार तपास :   

आज CBI ची टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तातडीने तपास होणार आहे . यासाठी एकूण पाच टीम तयार केल्या जाणार आहेत. या पाचही टीमवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असणार आहे. याबरोबर मुंबईतील CBI स्टाफची देखील मदत घेण्यात येणार आहे.   

cbi team with ten officers will reach mumbai team will stay in mumbai for seven days

loading image
go to top