Nana Patole : लम्पी आजार पसरवायला केंद्रानं जाणूनबुजून चित्ते आणले; पटोलेंचा अजब दावा

शेतकऱ्यांवर सूड उगवण्यासाठी मोदींनी ही खेळी केल्याचंही पटोलेंनी म्हटलं आहे.
patole_modi_chitah
patole_modi_chitah
Updated on

मुंबई : देशात लम्पी आजार पसरवण्यासाठी केंद्र सरकारनं मुद्दाम नायजेरियातून चित्ते आणले असा अजब दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याद्वारे मोदींनी जाणूनबुजून शेतकऱ्याचं नुकसान केलं आहे, असा गंभीर आरोपही पटोले यांनी केला आहे. (Center deliberately brought cheetahs to spread lumpy disease in India says Nana Patole)

एएनआय या वृत्तसंस्थेशी फोनवर बोलताना नाना पटोले म्हणाले, "पंतप्रधानांनी काळे कायदे (शेती कायदे) मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांशी कधीच बोलले नाहीत. उलट त्यांनी नामिबियातून चित्ते आणून याचा बदला घेत आहेत. चित्त्यांमुळंच लिम्पी व्हायरस भारतात आला"

patole_modi_chitah
CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ; 'या' दिवशी जाहीर सभा

"माझ्या 55 वर्षात असा आजार मी पाहिला नाही आणि माझ्या पूर्वजांनाही तो माहिती नव्हता. हा आजार भारतात जाणूनबुजून आणला आहे जेणेकरून शेतकर्‍यांचं नुकसान होईल. भारतात आणलेल्या चित्त्यांवरील डाग आणि गायींवर गोचिड सारखेच आहेत. हा रोग नामिबियामध्ये आधीच अस्तित्वात होता आणि आता तो भारतात पसरला आहे,” असंही ते पुढे म्हणाले.

patole_modi_chitah
Sun : जर सूर्य झोपला तर काय होईल? भारतीय संशोधकांनी समोर आणल्या भन्नाट गोष्टी

दरम्यान, पटोले यांच्या या विधानावर भाजपनंही भाष्य केलं आहे. "पटोलेंना या विधानासाठी सोनिया गांधींनी काँग्रेसचा नोबेल देऊन टाकावा. डॉक्टर पटोले यांचं हे हास्यास्पद विधान आहे, आपल्या विधानामुळं हा आजार गंभीर नसल्याचं त्यांनी सुचवलं आहे," असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. उलट पंतप्रधान मोदींमुळं या आजाराच्या प्रसारानंतर जनावरांना लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं.

patole_modi_chitah
Dasara Melava: आनंद शिंदेंच्या सूरांनी दणाणणार ठाकरेंचा मेळावा; येणार नवं गाणं

लम्पी विषाणूमुळं जनावरांमध्ये त्वचा रोगाची लागण होत असून भारतातील दुग्ध उत्पादनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. हा विषाणू फक्त गायी आणि म्हशींमध्ये आढळून आला आहे. लम्पीची लक्षणे नसलेल्या प्राण्यांचे मांस खाणे किंवा त्यांचे दूध वापरण्यात मानवांना कोणताही धोका नाही. लम्पीपासून प्राणी बरे होऊ शकतात. पण, अशा प्राण्यांच्या दुधावर विषाणूचा परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com