Bhiwandi Water Project
ESakal
मुंबई
Thane News: २०५४ पर्यंत तहान भागवणार! अमृत योजनेअंतर्गत ४२६ कोटींचा प्रकल्प; भिवंडी पालिकेचे रुपडे पालटणार
Bhiwandi Water Project: भिवंडीतील पाणीटंचाई सोडवण्यासाठी 'अमृत योजना २.०' अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्नही कायमचा मिटणार आहे.
भिवंडी : शहराच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या 'अमृत योजना २.०' अंतर्गत ४२६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले आहे. शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे २०५४ पर्यंतची गरज लक्षात घेऊन आखण्यात आलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला अतिरिक्त १०० एमएलडी पाणी मिळणार असून दूषित पाण्याचा प्रश्नही कायमचा मिटणार आहे.

