

Aarey Colony and Dindoshi Redevelopment
ESakal
गोरेगावच्या आरे कॉलनी आणि दिंडोशी वनक्षेत्रातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर केंद्र सरकारने या भागांच्या पुनर्विकासासाठी आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी राज्य सरकारला एक योजना तयार करण्याचे आणि संबंधित योजनेला मंजुरी दिल्यानंतर भारत सरकारला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.