

Mumbai Railway
- नितीन बिनेकर
मुंबई - मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचा विस्तार आणि वाहतूक क्षमता वाढविणाऱ्या महत्त्वाकांक्षी एमयूटीपी-३ प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. ‘राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजना २०२६-२७’अंतर्गत केंद्राने या प्रकल्पासाठी ४०६.५६ कोटी रुपयांची पहिली किस्त जारी केली आहे. हा निधी ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एमयूटीपी-३अंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.