Diwali 2022 : दिवाळीसाठी मध्य रेल्वेच्या आणखी १० फेस्टिव्हल ट्रेन!

मध्य रेल्वे मार्गावर दिवाळीनिमित्त आणखी १० अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेन चालविण्याची घोषणा केली
central railway 10 more festival trains of Central Railway for Diwali
central railway 10 more festival trains of Central Railway for Diwalisakal

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर दिवाळीनिमित्त आणखी १० अतिरिक्त फेस्टिव्हल ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांना मोठा दिलासाना मिळणार आहे. या दहा फेस्टिव्हल ट्रेनमध्ये मुंबई - नागपूर चार, नागपूर- पुणे चार आणि दोन नांदेड- हडपसर महोत्सव स्पेशल ट्रेनचा समावेश आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते नागपूर सुपरफास्ट स्पेशल (४ फेऱ्या ) धावणार आहे. ज्यामध्ये ट्रेन क्रमांक 02103 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 25 ऑक्टोबर 2022 आणि 1 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 20.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.25 वाजता नागपूरला पोहोचेल.ट्रेन क्रमांक 02104 स्पेशल नागपूर 28 ऑक्टोबर 2022 आणि 4 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या दोन्ही गाड्या कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा या स्थानकांवर थांबणार आहे. तर, नागपूर-पुणे फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनचा 4 फेऱ्या होणार आहे. ट्रेन क्रमांक 01405 विशेष गाडी 26 ऑक्टोबर 2022 आणि 2 नोव्हेंबर 2022 रोजी नागपूरहून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी पहाटे 6.25 वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01406 स्पेशल पुण्याहून 27ऑक्टोबर 2022 आणि 3 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 3.00 वाजता नागपूरला पोहोचेल. याशिवाय नांदेड-हडपसर महोत्सव स्पेशल ट्रेनच्या 2 फेऱ्या असणार आहे.

ज्यामध्ये ट्रेन क्रमांक 07403 स्पेशल नांदेड येथून 23 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 9.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजता हडपसरला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 07404 विशेष गाडी 24 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.50 वाजता हडपसरहून सुटेल आणि नांदेडला त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, घाटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी जंक्शन आणि दौंड जंक्शन थांबणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com